Astrology : आज वर्षातील शेवटची अमावस्या भाग्याची; 30 डिसेंबरपासून 3 राशींचं नशीब लखलखणार, नवीन रोजगाराच्या संधी प्राप्त होणार
वर्षातील शेवटची अमावस्या (Somvati Amavasya 2024) आज, म्हणजेच 30 डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी अनेक ग्रहांच्या देखील चाली बदलत आहेत. प्रेम, आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि संपत्तीचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाने नुकताच कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्राच्या राशी बदलामुळे 3 राशींना बंपर लाभ मिळू शकतो. या राशींसाठी 30 डिसेंबरपासूनचा काळ आणि नवीन वर्ष लाभदायी ठरू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries) : या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी बरेच फायदे मिळू शकतात.
तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कामातून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
मिथुन रास (Gemini) : नवीन वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप यश मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे आणि संघर्षाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
येत्या काळात पदोन्नतीसह पगारातही वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
मकर रास (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणाविषयी बोलायचे झाले तर, अधिकारी तुमच्या कामावर खूश असतील. अशा स्थितीत तुम्हाला बोनसही मिळू शकतो. कोर्ट केसेसमध्येही यश मिळू शकते.
नवीन वर्ष व्यावसायिकांसाठी खूप चांगले जाणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. आत्मविश्वासात झपाट्याने वाढ होणार आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.