Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यामध्ये अर्शदीप सिंगचं महत्त्वाचं योगदान होतं. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयसीसीनं पुरुष टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कारांसाठी त्याला मानांकन दिलं आहे. अर्शदीप सिंग शिवाय या गटात बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड आणि झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझाचा समावेश आहे.
अर्शदीप सिंगनं 18 मॅचमध्ये 13.5 च्या सरासरीनं 36 विकेट घेतल्या आहेत. टी 20 वर्ल्डकपमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली. 2022 मध्ये भुवनेश्वर कुमारनं 37 विकेट घेतल्या होत्या.
अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहाच्या जोडीनं विदेशी खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवलं.
अर्शदीप शिवाय भारतातून स्मृति मानधना पुर्सकाराच्या शर्यतीत आहे. तिला देखील आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नामांकित करण्यात आलं आहे.
अर्शदीप हा भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्यानं गोलंदाजीच्या जोरावर भारताला अनेकदा विजय मिळवून दिला आहे.
भारताला 2007 नंतर म्हणजेच 14 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकता आला त्यामध्ये अर्शदीपचं महत्त्वाचं योगदान आहे.