Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला 'या' दिशेला लावा दिवा; भगवान शंकराचा मिळेल आशीर्वाद, पुण्य फळ वाढतच जातील
अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावावर दान, तर्पण, पिंडदान करण्याचं महत्त्व आहे. तर, सोमवती अमावस्येला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने अनेक पुण्य फळ मिळतात. सोमवती अमावस्येला विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानुसार, पौष महिन्यातील सोमवती अमावस्या सोमवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी असणार आहे. या दिवशी दिवे प्रज्वलित करण्याचं महत्त्व आहे. तर, या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करावेत हे जाणून घेऊयात.
मुख्य द्वार - सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर दिवा नक्की लावावा. तसेच, पाण्याने भरलेला कलश ठेवावा. ज्योतिष शास्त्रानुसार, यामुळे घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं. आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
दक्षिण दिशा - घराची दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. सोमवती अमावस्येला या दिशेला दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात. आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.
पिंपळाच्या झाडाखाली - या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्की लावावा. हिंदू धर्मात असं मानतात की, पिंपळाच्या झाडावर देवी-दैवतांचा आणि पितरांचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
ईशान्य दिशा - सोमवती अमावस्येला घराच्या ईशान्य कोनाला दिवा लावणं शुभ मानतात. ईशान्य कोन घराच्या घराच्या उत्तर-पूर्व दिशेला म्हणतात. या दिशेला देवी-दैवतांचं निवासस्थान देखील म्हणतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)