Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, माणसांच्या जीवनावर शनीच्या स्थितीचा मोठा परिणाम होतो. शनि (Saturn) कधी वक्री असतो, तर कधी सरळ चालीत असतो, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्माचे फळ देणारा शनि जूनमध्ये वक्री झाला आहे, जो दिवाळीत देखील त्याच स्थितीत राहील.
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनि उलटी चाल चालणार आहे, ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर दिसून येईल, या काळात या राशींचं नशीब पालटू शकतं.
अशा 3 राशी आहेत, ज्यांना शनीच्या वक्री स्थितीमुळे मोठा फायदा होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn) : शनीची उलटी चाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धन आणि वाणी स्थानात प्रवेश करत आहेत. त्यामुळे, या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात.
तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. तुमचे अनेक अपूर्ण प्रकल्प यावेळी सुरू होऊ शकतात आणि भविष्यात तुम्हाला त्यांचा मोठा फायदा होईल. तसेच, या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.
मेष रास (Aries) : दिवाळीत शनीची उलटी चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीत उत्पन्न आणि लाभ स्थानी वक्री होत आहे, त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि कर्जापासून मुक्तता मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर व्यावसायिकांना मोठी डील करता येईल, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.
वृषभ रास (Taurus) : शनिदेवाची उलटी चाल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या कर्म घरात वक्री होईल, त्यामुळे या दिवाळीत तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरीची योजना आखत असाल तर यावेळी तुमच्या आवडीची नोकरी तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे.
या काळात तुम्ही पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या प्रयत्नांवर समाधानी राहतील. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल.