Shani Margi 2024 : शनीच्या मार्गीमुळे 'या' 3 राशींची दूर होणार साडेसाती आणि ढैय्या; लवकरच मिळणार पुण्य फळ
शनी आज म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी मार्गी होणार आहे. शनीच्या सरळ चालीमुळे अनेक राशीत मोठे बदल घडणार आहेत. तर, काही राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आतापर्यंत उलटी चाल चालत होते. पण. आता शनी कुंभ राशीत मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहे. आज संध्याकाळी ठीक 7 वाजून 51 मिनीटांनी शनी मार्गी होणार आहे.
शनीचं मार्गी होणं काही राशींसाठी शुभकारक ठरणार आहे. विशेषत: ज्या राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरु आहे अशा राशींना चांगलं फळ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
शनीच्या मार्गीमुळे मीन राशींचे देखील लवकरच अच्छे दिन सुरु होतील. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या ढैय्या आणि साडेसातीचा शेवटचा चरण सुरु आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीत शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. शनीची चाल चालताच या राशीला चांगले दिवस येतील. तसेच, तुमची सगळी संकटं दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)