सारंगच्या संगीत समारंभात सावली गाणार का गाणं ? नियतीने सारंग आणि सावलीच्या नशिबात काय लिहले आहे? लग्नाच्या पूर्वसंध्येला रचलेला जगन्नाथचा कट यशस्वी होईल का?
सारंगच्या संगीत कार्यक्रमात सावली गाणार का गाणं हा मोठा प्रश्न आहे. तिच्या भावना ती व्यक्त करणार का हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. सावली सारंगसाठी गात असेल तर त्यांचे नाते अधिक घट्ट होईल.
Continues below advertisement
savlyachi janu savali
Continues below advertisement
1/9
मराठी मालिका 'सावळ्याची जणू सावली' त सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु आहे.
2/9
लग्नाच्या तयारीकरिता सारंग आणि सावलीचा कुटुंब साडीच्या दुकानात जातात आणि सारंग सावलीसाठी एक सुंदर अशी साडी निवडतो, जी शेवटी सावलीपर्यंत पोहोचते.
3/9
दोन्ही कुटुंबांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला असतो तेव्हा सारंग त्याचा हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलतो आणि ती सावलीपर्यंत पोहोचते.
4/9
सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ असते आणि कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा अलका आणि जगन्नाथ परिस्थिती हाताळतात.
5/9
सावलीला हळदीत पाहून अलका भावुक होते कारण तिला तिच्या मुलीची आठवण येते तेव्हा जगन्नाथ तिचं सांत्वन करतो.
Continues below advertisement
6/9
सारंगच्या घरी संगीत समारंभाचा कार्यक्रम सुरु असताना भैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी बोलावते. परंतु, सावलीच्या घरी हळदी कार्यक्रम सुरू असल्या कारणाने घरचे तिला बाहेर जाण्यास मनाई करतात.
7/9
आपले दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सावली सर्व आव्हानांना स्वीकारून सारंगच्या घरी गाण्यासाठी जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे.
8/9
लग्नाच्या आदल्या दिवशी तिलोत्तमा काही अपशकुन करणार सारंगच्या घरी असं जाणवते.
9/9
'सावळ्याची जणू सावली' दररोज संध्या 7 वाजता फक्त आपल्या Zee Marathi.
Published at : 15 Nov 2024 12:10 PM (IST)