Shani Dev : पुढचे 76 दिवस 3 राशींना शनि देणार अपार पैसा; येणार सोन्याचे दिवस, सुख-संपत्तीत वाढच वाढ
शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात. कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा,अशी प्रत्येकाची इच्छा असते. शनीचा आशीर्वाद असेल तरच सर्व गोष्टी सुफळ संपन्न होतील, असा अनेकांचा समज असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातच तब्बल अडीच वर्षांनंतर शनि रास बदलणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील, तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल.
29 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल, सध्या तो स्वत:च्या कुंभ राशीत आहे.
शनि कुंभ राशीत असेपर्यंतचा 76 दिवसांचा काळ काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे, या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries) : शनीची कुंभ राशीतील उपस्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. पुढील 86 दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची योजना बनू शकते. अनावश्यक तणावापासून दूर राहिल्यास यश मिळू शकते.
व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
तूळ रास (Libra) : तूळ राशीच्या लोकांना शनीच्या कुंभ राशीतील उपस्थितीचा फायदा होईल. हा 86 दिवसांचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल. तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.
नोकरदार लोकांसाठी देखील वेळ चांगला राहील ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांचा विवाह होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo) : 28 मार्चपर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी खास असेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कामात तुमची प्रगती होऊ शकते, पगार वाढू शकतो.
व्यावसायिकांना विशेष लाभ मिळतील, तुम्ही आणखी काहीतरी नवीन सुरू करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळवण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील.