झटपट श्रीमंत व्हायचंय, तर 'या' 3 गोष्टींवर खर्च करा; बघता-बघता संपत्ती दुप्पट होईल!
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, दान केल्यानं धन वाढतं आणि श्रीमंत व्यक्ती आनंदी राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआचार्य चाणक्य सांगतात की, दान केल्यानं व्यक्तीची संपत्ती कमी होत नाही तर माणूस अधिक श्रीमंत होतो.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, गरजू आणि गरिबांना नेहमीच मदत केली पाहिजे.
निराधार आणि गरीब लोकांसाठी अन्न, कपडे आणि औषध यांसारख्या गोष्टींवर पैसे खर्च करताना फारसा विचार करायचा नाही.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्यानं धार्मिक कामांसाठी पैसा खर्च करण्यापूर्वी विचार करू नये, आपल्या ऐपतीनुसार पैसे खर्च करावे.
जी व्यक्ती धार्मिक गोष्टींवर पैसा खर्च करते, ती नेहमी श्रीमंत राहते. अशा व्यक्तींच्या जीवनात नेहमी आनंद राहतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, सामाजिक कार्यातही पैसा खर्च करताना अजिबात कंजुसी करू नये.
प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रती काही ना काही जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च केल्यानं फायदा होतो, तोटा नाही.
चाणक्य असाही सल्ला देतात की, दान नेहमी आपल्या क्षमतेनुसारच केलं पाहिजे. एखाद्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दान केल्यानं गरीबी येऊ शकते.
(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)