Rahu-Ketu : 30 ऑक्टोबरनंतर 'या' राशींचा भाग्योदय! राहू-केतूपासून मुक्त होणार, जाणून घ्या
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू आणि केतू राशी बदलणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. तसेच केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. कारण राहू आणि केतू नेहमी वक्री अवस्थेत प्रवास करतात.
राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळण्याची शक्यता आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, जाणून घ्या या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
मेष - 18 महिने राहूच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी हा राशी बदल मोठा दिलासा देणारा आहे. राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. मेष राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. तुमचे जे काम या काळात बिघडले होते ते पूर्ण होऊ लागेल.
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी अडचणींचा काळ सुरू होणार आहे कारण 30 ऑक्टोबरला राहू तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव तुमच्या राशीवर दिसून येईल. मीन राशीत राहुची गडबड दिसेल. अभ्यास करणाऱ्या लोकांना अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात मीन राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
धनु - राहू आणि केतूच्या संक्रमणाचा धनु राशीच्या लोकांवर परिणाम होईल. या संक्रमणामुळे धनु राशीचे लोक त्यांच्या कोणत्याही कामात नीट लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. पण काही क्षेत्रात यशही मिळेल.
तूळ-केतूच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. 18 महिन्यांनंतर केतू तुला सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीच्या लोकांना या काळात मोठे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. तुमचे टेन्शन संपुष्टात येईल.
कन्या - कन्या राशीच्या लोकांवर केतूच्या राशी बदलाचा प्रभाव दिसेल. 30 ऑक्टोबर रोजी केतू तूळ राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांच्या समस्या वाढू लागतील. या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अनेक लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात.
मिथुन - राहू आणि केतूचे राशी बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. कारण राहु तुमच्या राशीतून कर्माच्या घरी जाणार आहे. त्यामुळे जे अध्यात्म, ज्योतिष, विचारवंत, कथाकार आहेत, त्यांच्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असू शकतो. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. व्यावसायिकांना आर्थिक लाभासोबतच कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते.
वृषभ - राहू आणि केतूचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण राहुचे संक्रमण तुमच्या राशीतून लाभ आणि उत्पन्नाच्या ठिकाणी असेल. त्यामुळे यावेळी उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. अनपेक्षित धनलाभ होईल. तसेच, यावेळी तुमच्या घराचे आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण देखील खूप आनंददायी असेल. तुमच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. केतूची साथही तुम्हाला मिळेल. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)