Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितृ पक्षाच्या काळात पितरं पृथ्वीवर वास करतात. यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान वगैरे केली जातात, यामुळे पितरांचा आत्मा तृप्त होतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मात पितृ पंधरवड्याला अतिश्य महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपितृ पंधरवड्याच्या काळात श्राद्ध घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो आणि त्याच्या घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे.
हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीसाठी, यशासाठी आणि स्थैर्यासाठी देवांप्रमाणे त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात. पूर्वजांचे आशीर्वाद नसतील तर संबंधित व्यक्तीला आयुष्यात अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पितृपक्षाच्या काळात कोणत्याही शुभ गोष्टींना प्रारंभ करु नये, असा संकेत आहे. त्यामुळे या काळात कोणतेही व्यवहार किंवा नव्या वस्तुंची खरेदी केली जात नाही.
या काळात कोणतेही शुभकार्य उदाहरणार्थ लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेश करु नये.
पितृपक्षाच्या काळात चुकूनही एखाद्या नव्या प्रकल्पाची किंवा मोहीमेची सुरुवात करु नये. गाडी किंवा घर खरेदीची बोलणी किंवा व्यवहारही पितृपक्षाच्या काळात टाळावा, असा संकेत आहे.
पितृपक्षाच्या काळात मांसाहार वर्ज्य आहे. याशिवाय पितृपक्षाच्या काळात केस, दाढी आणि नखं कापू नयेत, असा संकेत आहे.
या काळात कोणतेही शुभकार्य उदाहरणार्थ लग्न, साखरपुडा किंवा गृहप्रवेश करु नये.
पितृपक्षाच्या काळात काय करावे अथवा काय करु नये, याबाबत काही संकेत आखून देण्यात आले आहे. त्यानुसार पितृपक्षात नव्या कपड्यालत्याची खरेदी करु नये. अगदी ऑनलाईन साईटवरुनही कपडे खरेदी करु नयेत.
पूर्वजांना खुश करण्यासाठी तुम्ही कावळा, गाय आणि कुत्र्याला अन्न खायला घालावे.
पितृपक्षाच्या काळात तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करु शकता. तुम्ही दानधर्म किंवा गरजूंना मदत केल्यास पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही जितका दानधर्म आणि सत्कर्म कराल, तितक्या प्रमाणात तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतील, अशी मान्यता आहे.