Pandharpur : मृग नक्षत्राच्या आगमनामुळे विठुरायाच्या चंदन उटी पूजेची सांगता; पाहा सावळ्या विठुरायाचं मनमोहक रुप
ग्रीष्मा ऋतूतील वाढत्या उष्णतेपासून विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी मातेला रोज दुपारी चंदन उटी पूजेची परंपरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानुसार, यंदाही 9 एप्रिलपासून देवाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली होती. आज मृग नक्षत्राच्या आगमनानंतर, परंपरेनुसार या चंदन उटी पूजेची सांगता करण्यात आली आहे.
श्री विठ्ठलाला उन्हाचा दाह जाणवू नये , उष्णतेची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून पंढरपूर मंदिरात ही चंदन उटी पूजा केली जाते.
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील या पद्धतीने चंदन उटी लावण्यात येते.
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार आणि रूक्मिणी मातेच्या पुजेसाठी 9 हजार इतके देणगी मुल्य आकारण्यात येते.
श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचं काम सुरू असल्याने दिनांक 15 मार्च ते 1 जूनपर्यंत पदस्पर्श दर्शन बंद करून फक्त पहाटे 5 ते सकाळी 11 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होतं.
त्यामुळे या कालावधीतील चंदन उटी पूजा भाविकांना उपलब्ध करून न देता मंदिर समिती मार्फत करण्यात आल्या होत्या.
पुन्हा 2 जून रोजी पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांना चंदन उटी पुजा उपलब्ध करून देण्यात आल्या.
त्यामध्ये विठ्ठलाकडे 18 आणि रूक्मिणी मातेकडे 12 भाविकांना पूजेचा लाभ मिळाला असून, यामधून मंदिर समितीला 4 लाख 86 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.
आज मंदिर समितीच्या वतीने श्रींची चंदन उटी पूजा करून या पूजेची सांगता करण्यात आली.