Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
मूलांक 1 चे लोक अत्यंत परखड असतात, त्यांच्या मनातील भावना ते ठामपणे व्यक्त करतात. कधीकधी यांच्या बोलण्यात फटकळपणा जाणवतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य असल्याने त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
1, 10, 19 किंवा 28 जन्मतारीख असलेले लोक स्पष्टवक्ते असतात. जे त्यांच्या मनात, तेच त्यांच्या तोंडावर असतं. एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट पटली नाही तर ते सरळ तोंडावर बोलतात.
1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असतो, यासोबतच या मूलांकाचे काही लोक चांगले नेतेही बनतात.
मूलांक 1 च्या व्यक्ती बोलण्यात बेधडक असतात. एखाद्याच्या समोर एक आणि मागून एक बोलण्याची सवय त्यांना नसते.
दुतोंडीपणा यांना आवडत नाही आणि त्यामुळेच त्यांना दुतोंडी व्यक्तींचा देखील राग येतो. अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहणं ते पसंत करतात.
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने सरकारी नोकरी मिळवण्यात देखील यशस्वी होतात आणि कामाच्या ठिकाणी टीमचं नेतृत्व देखील करतात.
हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात. मूलांक 1 चे अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे उठून येतात.
याशिवाय, हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात. यासोबतच कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही ते यश मिळवतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)