देवी लक्ष्मीला प्रिय आहे 'हे' फूल, घरात रोप लावल्याने होईल धन-संपत्तीत वाढ; अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय
Oleander Flower Medicinal Properties : हिंदू धर्मात पूजा किंवा पारंपारिक विधी करताना, त्यामध्ये विविध झाडे, फुले यांचा समावेश करण्यात येतो. काही झाडांचं पूजन केलं जातं, तर काही फुले पूजेमध्ये वापरली जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाता लक्ष्मीची पूजा करताना देवीचं आवडतं फूल वापरलं जातं. या फुलाचे धार्मिक महत्त्व असण्यासोबत त्याची आरोग्यदायी फायदेही आहेत.
कण्हेरी हे माता लक्ष्मीचं प्रिय फूल आहे. कण्हेरीच्या फुलाचे अनेक आयुर्वेदीक गुणधर्मही आहेत.
कण्हेर ही एक सुंदर आणि सदाहरित फुलांची वनस्पती आहे. कण्हेरीची फुले अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी असतात. ही फुले पांढरा, गुलाबी, पिवळे आणि लाल रंगात आढळतात.
कण्हेर झुडूप सुमारे 2 ते 6 मीटर उंच वाढते. त्याची पाने लांबट, गडद हिरवी असतात. ही वनस्पती वर्षभर बहरदार राहते. मुख्यत: हे झाडं सुशोभिकरणासाठी वापरलं जातं.
सुभोभिकरणासाठी वापरलेले जाणारे कण्हेर पारंपारिक औषधांमध्ये ते त्वचा रोग, संक्रमण आणि हृदय समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
कण्हेरीचं झाडं लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. कण्हेरीचं रोप घरामध्ये लावल्याने सकारात्मकता वाढते, आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते आणि वास्तुदोषही दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पांढरी आणि पिवळी कण्हेरीचं रोप लावावे. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
कण्हेरीमध्ये हृदयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. या फुलाच्या रसामध्ये कार्डिओटोनिक गुणधर्म आढळतात, जे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
कण्हेरी फुलांचा लेप त्वचेचे संक्रमण, खाज सुटणे आणि त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे सांधेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.