New Year 2025 : नवीन वर्षात 'या' 3 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा; उत्पन्नात होणार चिक्कार वाढ
नवीन वर्ष प्रत्येकासाठी उत्सुकतेचं, आनंदाचं असतं. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सारेच सज्ज आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच प्रत्येकाला नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर नवीन वर्षात कोणत्या राशींना लाभ मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार लाभदायक असणार आहे. मे 2025 नंतर तुमच्यावर राहु-केतूचा प्रभाव संपणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तर, आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतील.
2025 मध्ये गुरु ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शनीसुद्धा या राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्यावर ग्रहांची विशेष कृपा असेल. तुमच्या समस्या या काळात दूर होतील. तर, जीवनात सकारात्मक बदल घडतील.
मकर राशीच्या लोकांना नवीन वर्षात सर्व कर्जापासून मुक्ती मिळेल. या राशीवर सुरु असलेली साडेसाती संपेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद असेल. नवीन वर्ष तुमच्यासाठी फार शुभ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)