New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' गोष्टी; वर्षभर मिळेल सुख-शांती
नवीन वर्ष चांगलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर असे काही काम करु इच्छितो जेणेकरुन संपूर्ण वर्ष चांगलं जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवैदिक पंचांगानुसार, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 05 वाजून 25 मिनिटांपासून ते सकाळी 06 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे.
वर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा. तसेच, स्नान करुन मंदिरात जा. त्यानंतर, काही मंत्रांचा जप करा. तसेच, हातत जल घेऊन तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा. आणि त्यानंतर ते ओता.
ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु: शशि भूमि सुतो बुधश्च। गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांति करा भवंन्तु.. या मंत्रांचा जप करा.
त्याचबरोबर, गायत्री मंत्र, महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते.
त्यानंतर ध्यान करा. तुमच्या हाताकडे बघून 'ॐ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले: तू गोविंदा: प्रभाते कर दर्शनम्' मंत्र का जाप करें.या मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)