New Year 2025 : नवीन वर्षात चुकूनही 'या' चुका करु नका; अन्यथा संपूर्ण वर्षभर रडत बसाल, हाती येईल कंगाली
नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धीचं जावं यासाठी बऱ्याच गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन वर्षातली तुमची एक चूक संपूर्ण वर्षभर तुम्हाला त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोणाशीही वाद-विवाद, भांडण, ईर्ष्या आणि द्वेष मनात ठेवू नका. अन्यथा संपूर्ण वर्षभर तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. वाद-विवाद केल्याने घरात वादाची परिस्थिती निर्माण होते. आणि घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.
नवीन वर्षात कोणत्याही कर्जापासून स्वत:ला दूर ठेवा. कोणाकडूनही कर्ज घेणं ही चांगली गोष्ट नाही. यामुळे तुम्ही संपूर्ण वर्षभर तणावात राहू शकता.
नवीन वर्षात मद्यपान, करु नका तसेच मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नका. या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे सात्विक भोजनाचं सेवन करा.
नवीन वर्षात जर तुम्हाला सुख,शांती आणि समाधान हवं असेल तर तुमच्या सवयीत बदल करायला शिका. चिडचिड, राग आणि वेळोवेळी रडणं बंद करा. ज्या लोकांच्या या सवयी असतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नसते.
नवीन वर्षात ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करु नका. त्याचबरोबर महिलांचा सन्मान करा. त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका.