Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला बनतोय 'हा' शुभ संयोग, शनिच्या साडेसातीपासून मिळणार आराम! जाणून घ्या
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावाने शिवाची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता.
यावेळी महाशिवरात्रीला एक दैवी आणि दुर्मिळ योगायोग घडत आहे. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशीत असेल. कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर त्रिग्रही योग तयार होईल.
याशिवाय शनि प्रदोष व्रत हा देखील महाशिवरात्रीला शुभ संयोग बनत आहे. अशा स्थितीत तुमच्या राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल, तर तुम्ही या विशेष दिवशी काही उपाय करून आराम मिळू शकतो.
ज्या लोकांना शनि साडेसातीचा त्रास होत असेल, त्यांनी या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. यामुळे साडेसातीचे दुष्परिणाम कमी होतील.
ज्या लोकांना शनी ढैय्याचा त्रास होतो, अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जल अर्पण केल्यानंतर देवाचे स्मरण करून येथे पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
शनीच्या साडेसाती आणि ढैय्या सुरू असलेल्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस खास आहे. या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा करावी.
शनिदेवाच्या कृपेसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी दान करावे. यातून तुम्हाला विशेष फायदा होईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा.