तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची देवीच्या छबिन्याने सांगता, भाविकांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS
अप्पासाहेब शेळके
Updated at:
18 Oct 2024 10:30 AM (IST)
1
तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन काठ्यांना मोठा मान मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या छबिन्याने नवरात्र उत्सवाची सांगता झाली.
3
नवरात्र उत्सवाच्या दरम्यान देवीची रथयात्रा सुद्धा काढण्यात आली.
4
छबिण्यासाठी सोलापुरातील शिवलाड तेली समाजाच्या काठ्या आणि पालखीला मान आहे.
5
वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार सोलापुरातून या मानाच्या काठ्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीच्या दरबारात दाखल झाल्या.
6
तुळजाभवानी मातेचा छबिना या काठ्यांसह मोठ्या उत्साहात काढण्यात आला.
7
राज्यभरातून आलेल्या भाविकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
8
तुळजापूर आणि सोलापूरचे असे अनोखे नाते या अनोख्या धार्मिक परंपरेने चार शतकांपासून जोडले गेले आहे.