Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निकालाला उरले अवघे काही तास, धाकधूक वाढली; ठाकरेंचे शिलेदार बंडू जाधव विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात, पाहा फोटो
परभणी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मतमोजणीचे एक दिवस अगोदर पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज त्यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आहे.
मतमोजणीच्या एक दिवस आधी संजय जाधव यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
उद्या निकाल लागणार असून त्याआधी त्यांनी पंढरपूरला जाऊन दर्शन घेतलं आहे.
निकालाआधी धाकधूक वाढली असल्याने अनेक उमेदवारांनी देवाचं दर्शन घेतलं आहे.
दोन दिवसांआधी 79 दिवसानंतर विठुरायाच्या पायावरील दर्शन सुरू झाल्याने पंढरपुरात आषाढीप्रमाणे गर्दी झाली होती.
1 जून रोजी रात्री आठपासून देवाचं रूप पाहण्यासाठी हजारो भाविक दर्शन रांगेत उभे होते .
2 जून रोजी सकाळी सहापासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली.
पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
मागील दोन दिवस मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.