Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appॠषीपंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सभामंडपात गणपतीसमोर महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करायला सुरुवात केली.
यावेळी हजारो महिलांचा जनसमुदाय अथर्वशीर्ष पठणासाठी पाहायला मिळाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्यावतीने उत्सवाच्या 132 व्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महिलांनी अथर्वशीर्ष पठण सुरु केले. त्यापूर्वी महिलांनी शंख नाद केला.
या जनसमुदयानं एका स्वरात एका तालात अथर्वशीर्ष पठण केलं. यावेळी सर्व महिला पारंपरिक पोषाख, जरीची साडी परिधान करुन आल्या होत्या.
यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृशाली शिंदे यादेखील सभामंडपात उपस्थित होत्या.