Jejuri Somvati Aamavasya 2024 Photos : जेजुरी गडावर सोमवती अमावस्येचा उत्साह; खंडेराया नगरीत भंडाऱ्याची उधळण, लाखो भाविकांची गर्दी
आज जेजुरी गडावर सोमवती अमावस्या उत्सव साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या सोमवारी अमावस्या येते, त्या दिवसाला सोमवती आमावस्या असे म्हणतात. त्या दिवशी खंडोबाची यात्रा भरते, या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जेजुरीमध्ये येत असतात.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे.
काल रात्रीपासूनच जेजुरी रोषणाईत आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाली आहे.
नववर्षाची सुरुवात होत असल्याने देखील खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे.
राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी गर्दी केली आहे.
जेजुरी नगरीत भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे.
सोमवती अमावस्या उत्सवानिमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी दुपारी एक वाजता निघेल.
साडेपाच वाजता पालखी कऱ्हा नदी पात्रात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी विधीवत पूजा करून देवांना कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येईल.
यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि येळकोट येळकोटच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन जाईल.
परंतु त्या आधीच जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे.
यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत.
जेजुरी गड फुलांनी सजला आहे आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाला आहे.
सोमवारी अमावस्या येत असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते.
खंडेरायाची जेजुरी आज पिवळीधमक झाली आहे.
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या.
राज्यभरातील भाविक आज खंडेराया चरणी नतमस्तक झाले.
अनेक ठिकाणी तळी भरणी केली जात आहे.
भाविक भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत.