Jalgaon News : संत मुक्ताई यांच्या 727 व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त भाविकांची मांदियाळी; भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण
संत मुक्ताबाई यांचा आज 727 वा अंतर्धान सोहळा पार पडतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगरातील कोथळी येथील संत मुक्ताबाई समाधी स्थळी आज हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
727 वर्षांच्या पूर्वी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळी येथे संत मुक्ताईबाई विजेच्या कडकडात अंतर्धान पावल्याची आख्यायिका आहे.
तेव्हापासून कोथळी येथील समाधी मंदिरात दरवर्षी हजारो भाविक त्याचबरोबर दिंड्या आणि पालख्यांसह दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसून आलं आहे.
700 वर्षांहून अधिक काळापासूनच ही परंपरा आजपर्यंत कायम असल्याचं चित्र आहे.
अंतर्धान सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा,महाप्रसादासह भजन कीर्तन आणि पारायण आयोजित करण्यात येत असते.
त्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने सहभागी होत असल्याचं पाहायला मिळते.