Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंतीला घरात लावा हे रोप, कुटुंबात प्रेम वाढेल, कलह आणि तणाव कमी होईल
आज 25 जानेवारी 2023 ही माघी गणेश जयंती आहे, या दिवशी घरामध्ये अंजीराचे रोप लावल्यास घरात येणारे सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधार्मिक पुराणांनुसार, अंजिराच्या झाडामध्ये बुद्धी देणाऱ्या गणपतीचे निवासस्थान मानले जाते.
अंजिराच्या झाडाच्या मुळाशी भगवान गणेश वास करतात. गणेश जयंतीला घरामध्ये लावल्यास अनेक प्रकारच्या समस्याही संपतात असे म्हणतात.
गौरीनंदन गजानन याला विघ्नहर्ता म्हटले जाते. असे म्हणतात, गणेशाच्या कृपेने घरामध्ये अंजीराचे रोप लावल्याने कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कलह होत नाही.
अंजिराचे रोप लावल्याने घरात कुटुंबावर कधीही तंत्र, मंत्र, चेटूक यांचा प्रभाव पडत नाही. असे म्हणतात.
अंजिराचे रोप घराच्या मुख्य दारावर किंवा पूर्व दिशेला लावावे. यामुळे कुटुंबावर बाप्पाची कृपा सदैव राहते, असे म्हटले जाते
अनेक वेळा एखादी व्यक्ती अनेक दिवस आजारी राहते, परंतु गंभीर आजार आढळून येत नाही. अशा परिस्थितीत अंजीराच्या झाडाच्या मूळाचा उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो
गणपतीच्या पूजेत हे मूळ ठेवून, ॐ नमो विनायकाय अमृतं रक्ष रक्ष, मम फलसिद्धिं देहि, रुद वचनेन स्वाहा। या मंत्राचा 108 वेळा जप करा.
हे मूळ रुग्णाच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि संध्याकाळी निर्जन ठिकाणी पुरून टाका. यातून गणपती सर्व शारीरिक वेदना दूर करतात, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)