Ganesh Chaturthi 2024 : गणेशाच्या पूजेत 'या' 7 मंत्रांचा जप नक्की करा; बाप्पा होईल प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण
गणेशोत्सवा निमित्ताने गणेशभक्त आपल्या घरी बाप्पााची स्थापना करतात. त्यांची मनोभावे सेवा करतात. पण, गणपतीच्या पूजा, मंत्र आणि जपशिवाय गणेशाची पूजा अधुरी मानली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासाठीच गणरायाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही खास मंत्रांचा जप करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की, असे केल्याने भक्तांची सर्व इच्छा पूर्ण होते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्त्याची मूर्ती स्थापना आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. पण, पूजेच्या दरम्यान काही मंत्रांचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतात.
गजानंद एकाक्षर मंत्र हा मंत्र भगवान गणेशाच्या सर्वात प्रभावी मंत्रांपैकी एक मानला जातो. या मंत्राच्या उच्चारणाने भक्तांची सर्व कष्ट दूर होतात. बुधवारच्या दिवशी पूजेच्या दरम्यान तुम्ही या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
या मंत्राचा जप 108 वेळा करावा. या मंत्राचा जप करुन हिरव्या रंगाची गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला मुख करुन स्थापित करा. गणपतीची पूजा झाल्यानंतर लाल आसनावर बसून या मंत्राचा जप करावा. हा जप 11 दिवस केल्याने तुमच्यावर गणेशाची कृपादृष्टी राहील.
गणपतीचे हे दोन्ही मंत्र अपार धन-संपत्ती प्राप्त करण्यासाठी वापरले जातात. तुम्हाला गणपती आणि देवी लक्ष्मीच्या पूजेनंतर या दोन्ही गणेश मंत्राचा जप 108 वेळा करणं गरजेचं आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल.
गणपतीचा हा मंत्र सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतात.
या मंत्राचा जप केल्याने समाजात तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळते. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसेल तर तुम्ही रोज या मंत्राचा जप करावा.
श्री गणेश गायत्री मंत्र हा फार फलदायी मानला जातो. बुधवारच्या दिवशी पूजेत 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचं नशीब उजळतं. तसेच, गणेशाची देखील विशेष कृपा राहते.
गणेश कुबेर मंत्र तुम्ही दररोज किंवा प्रत्येक बुधवारी पूजेची माळ हातात घेऊन 108 वेळा याचा जप केल्यास तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात. तसेच, कर्जापासून मुक्ती मिळते.