Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये केस आणि नखं कापणं शुभ की अशुभ?
घराघरांत मोठ्या भक्तीभावानं बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. अशातच अनेक घरांत गणेशोत्सव काळात सोवळं पाळलं जातं. प्रत्येक घराघरांत अनेक प्रथा, परंपरांचं पालन केलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकांना, या दिवसांत काय करावं? काय करू नये? असे अनेक प्रश्न पडतात. अशातच गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थदशीपर्यंतच्या काळात नखं आणि केस कापावे की नाहीत? याबाबत अनेक शंका आहेत.
केस किंवा नखं कापण्याचे नियम महाभारतात सांगितले आहेत, जाणून घ्या, गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सवाच्या 10 दिवसांत केस आणि नखं कापू शकतो (Hair and Nail cutting) की नाही?
गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी बाप्पा घरात विराजमान होतो. या काळात केस आणि नखं कापणं अशुभ मानलं जातं. यावेळी गणेश चतुर्थी शनिवारी येत असून या दिवशी अनेकजण विनायक चतुर्थी व्रत पाळतात. अशा परिस्थितीत शनिवारी केस आणि नखं कापून उपवास केल्यानं पूजेचं फळ मिळत नाही.
धार्मिक ग्रंथांनुसार केस आणि नखं नेहमी कापली पाहिजेत, त्यांची निगा राखली पाहिजे, त्यांच्या वाढीचा आरोग्यावर परिणाम होतो. तसेच, सुख-समृद्धीवरही प्रभाव होतो, त्यामुळे गणेश उत्सवादरम्यान केस आणि नखं कापू शकतात की नाही? असा प्रश्न अनेकांना पडलाय...
गणेशोत्सवाचे दहा दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. असं म्हणतात की, ज्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना होते, त्या घरात या दिवसांत केस किंवा नखं कापू नयेत, यामुळे कुटुंबातील आयुष्य कमी होतं, असं मानलं जातं.
गणेशोत्सवादरम्यान तामसिक पदार्थ घरात ठेवू नका किंवा खाऊ नका. असं मानलं जातं की, याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर आणि आयुष्यावर होतो.
गणेश चतुर्थीचे 10 दिवस ब्रह्मचर्य पाळा आणि आपल्या मनात पुण्यपूर्ण विचार ठेवा. या काळात कोणाचाही अपमान करू नका.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानलं जाते. असं मानलं जातं की, या दिवशी चंद्राकडे पाहणं किंवा त्याची पूजा केल्यानं दोष लागतो.
(वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)