Dussehra 2024 : दसऱ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला झेंडूच्या पानाफुलांची आकर्षक सजावट; विठुरायाच्या रावुळीला आलं सोन्याचं रूप पाहा PHOTOS
या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आज विठ्ठल मंदिरात पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला झेंडूच्या पानाफुलांची अतिशय आकर्षक सजावट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सजावटीसाठी जवळपास तीन टन झेंडूची पाणी फुले वापरली असून यामध्ये आपट्याच्या पानांची प्रतिकृती ही अत्यंत आकर्षक रीतीने करण्यात आलेली आहे.
ही सजावट अतिशय आकर्षक अशा पद्धतीने करण्यात आली आहे. मंदिरातील वातावरण प्रसन्न झालं आहे.
ही सजावट करण्यासाठी राम जांभुळकर यांचे 20 कामगार दहा तास या सजावटीचे काम करत होते.
आज झेंडूच्या फुलांचं महत्त्व असल्याने मंदिराला केलेल्या झेंडूच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिराला सोन्याचे रूप आले आहे.
तसेच, आजच्या दिवशी या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर भक्तांच्या देखील मोठ्या रांगा लागल्या आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.
विठुरायाचं मंदिर आपट्याच्या पानांनी आणि फुलांनी सजविल्यामुळे मंदिराला विशेष देखणं रुप आलं आहे.