Diwali 2024 : दिवाळीला पांढरा घुबड-उंदीर दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रात काय म्हटलंय...
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्याप्रकारे, देवी लक्ष्मीला धनधान्य, संपत्तीची देवी मानण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, कुबेराचं संबंधसुद्धा संपत्तीशी संबंधित आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, असं मानण्यात आलं आहे की, दिवाळीच्या दिवसांत पांढरा घुबड आणि उंदीर दिसणं शुभ आहे. यामागे नेमकं कोणतं कारण आहे ते जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात, पांढऱ्या घुबडाला देवी लक्ष्मीचं वाहन मानण्यात आलं आहे. त्यामुळे या दिवशी पांढरा घुबड दिसणं अत्यंत शुभ आहे. यामुळे घरात आनंद राहतो.
तसेच, पांढरा घुबड दिसल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मकता येते.
हिंदू धर्मात, उंदराला कुबेराचं प्रतीक मानण्यात आलं आहे. असं म्हणतात की, दिवाळीला तुम्हाला उंदीर दिसला तर तुमच्यावर भगवान कुबेराची कृपा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)