Chanakya Niti : शूsss बायकोशी संबंधित 'ही' 7 गुपितं कोणालाच सांगू नका, चाणक्य सांगतात...
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीत आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये चाणक्यांनी पती-पत्नीच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाणक्य यांनी बायकोशी संबंधित अशी गुपिते सांगितली आहेत ज्याचा उल्लेख नवऱ्याने कुठेच करु नये.
जर तुम्ही पत्नीच्या एखाद्या गोष्टीमुळे नाराज झाला असाल तर त्याचा उल्लेक चारचौघांत किंवा इतर कोणाकडेही करु नका. अन्यथा लोक तुमची थट्टा करतील.
चाणक्यांनी सांगितलेल्या नियमांमध्ये असंही सांगितलं आहे की, तुमच्या घरात तुम्हाला किंवा तुमच्या पत्नीला कितीजरी संकटांचा, आव्हानांचा सामना करावा लागला तरी त्याचा उल्लेख कोणाकडेही करु नये. थोडक्यात तुमची कमकुवत बाजू कोणालाच सांगू नका. अन्यथा लोक त्याचा फायदा घेतील.
जर तुम्ही तुमच्या नात्याची कमकुवत बाजू इतरांसमोर उघड केली तर त्याचा परिणाम तुमच्या आणि पत्नीच्या सन्मानावर होतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, नवरा-बायकोमधील वाद आणि गुपितं घरातच राहिलेली बरी असतात. अन्यथा लोक त्याचा गैरफायदा घेतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)