Astrology : झूठ बोले कौआ काटे...लाख प्रयत्न करा पण 'या' राशींच्या लोकांशी खोटं बोलू नका; झटक्यात व्हाल 'चेकमेट'
आपल्यापैकी अनेकजण अनेकदा आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी अनेकदा खोटं बोलतात. पण, असे बरेचसे लोक आहेत जे इतरांचं खोटं बोलणं एका झटक्यात पकडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्योतिष शास्त्रात अशा अनेक राशींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्या इतरांचं बोलणं लगेच पकडतात. या 4 राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास - मेष राशीचे लोक दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट अगदी सहज ओळखतात. मेष राशीच्या लोकांना माणसं पटकन ओळखता येतात. यासाठीच यांच्याशी कधीच खोटं बोलू नका.
वृश्चिक रास - वृश्चिक राशीचे लोक देखील इतरांचा चेहरा किंवा त्यांचं खोटं बोलणं लगेच ओळखतात. त्यामुळे यांच्यासमोर खोटं बोलू नका. ते झटक्यात पकडतील.
कुंभ रास - कुंभ राशीचे लोक तसे फार शांत स्वभावाचे असतात. इतरांना पारखण्याची यांच्यात चांगली क्षमता असते. त्यामुळे यांच्याशी खोटं बोलाल तर तुम्हालाच पश्चात्ताप होईल.
मीन रास - मीन राशीचे लोक हे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार इतरांना पारखतात. तसेच, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला हे पटकन ओळखतात. हे लोक वेळ आल्यावर तुमच्याकडून सत्य वधवूनही घेण्यात तरबेज असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)