Female Naga Sadhu : महिला नागा साधू कशा बनतात? जाणून घ्या त्यांच्या जीवनाविषयी...
भारतीय सनातन धर्मानुसार, जेव्हा भारतातील धन-संपत्तीच्या हव्यासापोटी अनेक आक्रमणकारी भारतात येत होतो तेव्हा शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या स्थापनेसाठी अनेक पावलं उचलली. ज्यामध्ये एक कारण असे होते की, देशाच्या कानाकोपऱ्यात 4 पीठे बांधणे. मग त्यांनी आखाडे तयार केले आणि नागा साधू देखील त्यांचा एक भाग झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आखाड्यांमध्ये पुरुष नागा साधूंप्रमाणेच महिला नागा साधूही असतात. महिला नागा साधूंचे जीवन अत्यंत रहस्यमय आणि कठीण असते. त्यांना अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते आणि ब्रह्मचर्य पाळून कठीण आयुष्य जगावं लागतं.
सांसारिक जीवनाशी असलेला संबंध पूर्णपणे तोडण्यासाठी महिला नागा साधू जिवंत असताना पिंडदानही करतात. स्वत:चं मुंडन केल्यानंतरच त्यांना साधू बनण्याची दीक्षा देतात.
महिला नागा साधू सामान्य जगापासून दूर जंगलात, गुहा, पर्वतांमध्ये राहतात आणि देवाची पूजा, आराधना, जप करतात. फक्त जेव्हा कधी कुंभमेळा असतो तेव्हाच ते जगासमोर येऊन आपलं दर्शन देतात.
अशा परिस्थितीत महिला नागा साधूदेखील पुरुष नागा साधूंप्रमाणेच नग्न राहतात का? असा प्रश्न उपस्थित होतो. पण, असं नाहीये. नागा साधू महिला भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात.
महिला नागा साधूंना दीक्षा देण्यापूर्वी, त्या भविष्यात या कठीण मार्गावर चालू शकतील की नाही, याचे प्रत्येक पैलूवर मूल्यांकन केले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)