Astrology : तुम्हीही काळ्या रंगाची छत्री वापरताय? हा रंग तुमच्यासाठी किती शुभ? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचा आपल्यावर बराच प्रभाव पडतो. काळा रंग हा अशुभ मानण्यात येत असला तरी शास्त्रात त्याचं बरंच महत्त्व सांगितलं आहे. अगदी वाईट नजर टाळण्यासाठी देखील आपण काळा धागा वापरतो. त्याच प्रमाणे काळी छत्री वापरणंही तितकंच शुभ आहे का यावर नजर टाकूया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुळात शनिदेवाचा रंग देखील काळा आहे आणि शनिदोष दूर करण्यासाठी काळ्या रंगाची छत्री दान केली जाते.
गरजूंना काळ्या रंगाची छत्री दान केल्याने शनीचा त्रास कमी होतो, त्यामुळे काळ्या रंगाची छत्री तशी शुभच मानली जाते.
शास्त्रात काळा रंग महत्त्वाचा मानला गेला आहे. काळ्या रंगात सर्व वाईट शक्ती दूर ठेवण्याची ताकद आहे, काळ्या रंगाच्या छत्र्या देखील त्याचंच काम करतात.
काळ्या रंगाच्या छत्र्यांची मागणी बाजारात जास्त असते, पाचपैकी 3 लोक हे काळी छत्री वापरतानाच दिसतात.
काळ्या रंगाची छत्री शनिदेवाशी संबंधित आहे, त्यामुळे तिचा वापर करणं हे विविध अंगांनी शुभ ठरतं.
तुम्ही स्वत: काळ्या रंगाची छत्री वापरण्यासह गरजूंनाही ही छत्री दान करू शकता.
काळ्या छत्रीचं दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि सर्व त्रासांपासून आराम मिळतो.
काहीजण काळ्या रंगाला अशुभ मानतात आणि त्यामुळेच ते ना काळ्या रंगाचे कपडे वापरत, ना काळ्या रंगाची छत्री.
परंतु काळा रंग हा काही गोष्टींच्या बाबतीत लाभदायी ठरतो आणि हेच शास्त्र काळ्या छत्र्यांनाही लागू होतं.