भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतातील शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळतं. भारताच्या अर्थव्यवस्थेत कापूस आणि कापड उद्योगाची भूमिका मोठी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. कापूस शेती अन् उत्पादनामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होतं?
कापसाचा वापर कापड बनवण्यासह इतर उत्पादनांसाठी देखील केला जातो. तेल, बियाणं आणि खाद्यपदार्थ क्षेत्रात कापूस महत्त्वाचा ठरतो.ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणीय बदलाचा विपरीत परिणाम कापूस शेतीवर होत असतो. भारतात अनेक राज्यांमध्ये कापसाची शेती केली जाते.
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य आणि जिल्ह्यांचा विचार केला असता महाराष्ट्राचा क्रमांक पहिला लागतो. महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याला कॉटन किंग म्हणतात. देशात सर्वाधिक कापूस उत्पादन या जिल्ह्यात होतं. इथं सर्वात मोठ्या मिल अन् कारखाने आहेत.
भारतात महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे. काळी माती कापसाच्या शेतीसाठी उपयुक्त आहे.कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, गुजरात,तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो.