Karvand : हिंगोली जिल्ह्यात 30 एकरवर फुलली करवंदाची बाग
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कांडली येथील एका शेतकऱ्याने करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी प्रयोग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरवंद शेतीतून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
करवंद शेतीतून आठ एकरात 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मधुकर पानपट्टे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
हलक्या जमिनीमध्ये करवंदाची लागवड करुन हिंगोलीच्या कांडली येथील शेतकरी मधुकर पानपट्टे हे लखपती झाले आहेत.
दोन एकर क्षेत्रात त्यांनी करवंदाच्या बागेची लागवड केली होती. ती बाग आता 30 एकरपर्यंत वाढवली आहे.
12 वर्षांपूर्वी शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी त्यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर दोन एकरमध्ये करवंदाच्या बागेची लागवड केली होती.
लागवड केलेली ही बाग पुढील तीन वर्ष जोपासवी लागते. तिसऱ्या वर्षापासून करवंदाच्या बागेतून उत्पन्न निघायला सुरुवात होते.
बाग लागवड करत असताना फक्त रोपटे खरेदी करण्यासाठीच पैसे लागतात. त्यानंतर कुठेही एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही खते किंवा औषधी फवारणीचा खर्च सुद्धा यासाठी लागत नाही.
दोन एकरमधील करवंदाच्या बागेतून पहिल्या वर्षी दोन लाख रुपयाचे उत्पन्न झाल्याचे शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी सांगितले.