Black Thrips on Capsicum : सिमला मिरची उत्पादक शेतकरी ब्लॅक थ्रीप्स किडीमुळे अडचणीत
ढोबळी मिरचीवर 'ब्लॅक थ्रीप्स' या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये तसंच राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फूलकिडे आढळत आहेत.
त्याचे शास्त्रीय नाव 'थ्रीप्स पार्विस्पिनस' असे आहे. फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे.
ही प्रजाती भारतामध्ये 2015 मध्ये प्रथम पपई या पिकावर आणि त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती.
ब्लॅक थ्रीप्समुळे ढोबळी मिरची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी मिरचीची पिके काढून फेकत आहेत.
या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मिरची उत्पादनात प्रचंड अशी घट झाली आहे.
एकरी दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खर्च केला असला तरी त्यांच्या हाती तितकेही उत्पादन येणार नसल्याची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.
फूलकीड आकाराने लहान असून, पानाखाली आणि वर राहते. ती डोळ्यांना सहज दिसू शकते. ती कळ्या, फुलांमध्ये दिसून येत असल्यामुळे तिला 'फ्लॉवर थ्रीप्स' किंवा रंगाने काळी असल्यामुळे 'ब्लॅक थ्रीप्स' या नावानेही संबोधले जाते.
प्रौढ किडींपेक्षा पिले जास्त नुकसान करतात. या किडीच्या प्रार्दुभावामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. पानामध्ये खोलगट भाग तयार होतो.