Banana Price: केळीला सोन्याचा भाव! जळगावात केळी 70 रुपये डझन, सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट
जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात अग्रेसर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र आज सर्वसामान्य जनतेला केळी मिळणे दुरापास्त झाले आहे
मागील काही महिन्यात केळी पिकावर आलेली विविध संकटे जसे चक्रीवादळ,गारपीट आणि सी एमवी व्हायरसचां झालेला प्रादुर्भाव याचा थेट परिणाम पिकावर पाहायला मिळत आहे.
केळी उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊन सुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
सी एम वीमुळे जळगाव जिल्हयातील 80 हजार हेक्टर क्षेत्र पैकी पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
त्यामुळे केळी उत्पादन कमी प्रमाणात होत आहेत..
तसेच यंदा थंडीचा लांबलेला सिझन हा सुद्धा केळी उत्पादकांसाठी अडचणीचा ठरला आहे.
सध्या केळी उत्पादनात मोठी घट आली आहे
पुढील महिन्यात मात्र केळीची मोठी आवक होण्याची चिन्हे आहेत
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे.