Gram : खुल्या बाजारात हरभऱ्याची कमी दरानं खरेदी
हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.
शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. नाफेडच्या वतीनं ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे
सरकारनं नाफेडच्या माध्यमातून हमीभावानं हरभरा खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरवर्षी, नाफेडच्या माध्यमातून राज्यात विविध राज्य अभिकर्ता संस्थेकडून किमान हमी दरानुसार शेतीमाल खरेदी केला जाते.
खुल्या बाजारात कमी दरानं हरभऱ्याची विक्री केल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
हरभऱ्याचा हमीभाव 5 हजार 300 असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी खरेदी केंद्रावर रांगा लावत आहेत.
नाफेडचे हमीभाव हे 5300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे.
राज्यभरात यावर्षी 29 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून हरभरा कढणीची लगबग सुरु आहे.