Tomato : टोमॅटोच्या दरात वाढ, नेपाळमधून भारतात टोमॅटोची आयात
वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance minister Nirmala Sitharaman) यांनी टोमॅटो आयात करण्यासंदर्भातील निर्णय दिला आहे.
देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचे अर्तमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या. त्यामुळं भारत आता नेपाळमधून टोमॅटो आयात करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी लोकसभेत दिली.
टोमॅटोचो आयातीचा पहिला लॉट आज उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर शहरात पोहोचणार आहे.
घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे
सध्या 150 ते 200 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.
अवकाळी पाऊस, जास्त तापमान आणि पिकावर झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव याचा टोमॅटोवर मोठा परिणाम झाला आहे.
पिकाचं नुकसान झाल्यामुळं बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला याचा परिणाम दरांवर झाला आहे.
जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं महागाई वाढल्याचे दास म्हणाले