Arunachal Tour : IRCTC ची खास अरुणाचल टूर, मिळतील 'या' सुविधा
तुम्हीही अरुणाचल प्रदेशात जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने एक खास पॅकेज आणलं आहे.(PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वेचे IRCTC देशाच्या विविध भागांसाठी वेळोवेळी विविध प्रकारचे टूर पॅकेज आणते. आयआरसीटीसीच्या अरुणाचल टूरची माहिती जाणून घ्या.(PC:istock)
या पॅकेज टूरची सुरुवात गुवाहाटीपासून होणार आहे. अरुणाचल-गेटवे टू सेरेनिटी एक्स गुवाहाटी (Arunachal-Gateway To Serenity Ex Guwahati) असं या पॅकेजचे नाव आहे.(PC:istock)
हे पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीसाठी आहे. तुम्ही दर शुक्रवारी या पॅकेजचा आनंद घेऊ शकता. हे पॅकेज गुवाहाटी विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल.(PC:istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला अरुणाचल प्रदेशातील तवांग, दिरांग आणि बोमडिला येथे जाण्याची संधी मिळेल. (PC:istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्हींची सुविधा मिळेल.(PC:istock)
प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल. यासोबतच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचीही सोय असणार आहे.(PC:istock)
यासोबतच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचीही सोय असणार आहे.(PC:istock)
या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीसाठी 44,900 रुपये, दोन लोकांसाठी 33,370 रुपये आणि तीन लोकांसाठी 30,930 रुपये मोजावे लागतील.(PC:istock)