गव्हासह तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
सध्या देशातून गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात (Wheat Export) केली जात आहे. गेल्या सात महिन्यांच्या काळात देशातून 46 लाख टन गव्हाची निर्यात झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांदळाच्या निर्यातीत (Rice Export) देखील वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं (Central Government) गहू आणि तादळाच्या निर्यातीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
यावर्षी तांदळाच्या निर्यातीत देखील मोठी वाढ झाली आहे. 2022-23 च्या पहिल्या सात महिन्यांत 24.10 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.
गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा देशात गव्हाची मोठ्या प्रमाणावर पेरणी होत आहे. एक-दोन राज्ये सोडली तर सर्वच राज्यांमध्ये गव्हाचा पेरा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
भारत अन्नधान्याच्या बाबतीत देशांतर्गत गरज पूर्ण करत आहे. तसेच इसर देशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे.
केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 46.56 लाख टन गव्हाची निर्यात झाली होती. त्याची किंमत 1.5 अब्ज डॉलर्स आहे. तर 2021-22 मध्ये 2.12 अब्ज किंमतीचा गहू निर्यात झाला होता.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच गव्हाच्या दरात वाढ झाली होती. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम देशातील गव्हाच्या किंमतीवरही झाला होता.
सध्या देशात गव्हाच्या साठवणुकीची स्थिती ठीक आहे. त्यामुळं निर्यातदार अनेक दिवसांपासून गव्हाच्या निर्यातीत सूट देण्याची विनंती केंद्र सरकारकडं करत होते. देशातील अन्नसुरक्षेची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारनं गव्हाची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
तांदळाच्या निर्यातीत देखील मोठी वाढ झाली आहे. 2022-23 च्या पहिल्या सात महिन्यांत 24.10 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.