Tag News : कच्च्या तागाच्या किमान हमीभावाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या (Raw jute) किमान हमीभावाला (MSP) मंजुरी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
2023-24 या हंगामासाठी कच्च्या तागाचा ( टीडी-3 यापूर्वीच्या टीडी-5 स्तराइतका) हमीभाव प्रतिक्विंटल 5050 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाचा जाहीर करण्यात आलेला हमीभावानुसार उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा मिळेल.
या हंगामात कच्च्या तागाला प्रतिक्विंटलसाठी 5050 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.
ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित करण्यासाठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे.
दर्जेदार तागाचे उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
तागाच्या नफ्याचे प्रमाण किमान 50 टक्के सुनिश्चित करण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.
हमीभाव प्रतिक्विंटल 5050 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कृषी खर्च आणि दर आयोगाच्या (CACP) शिफारशीवरुन ही मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.