Buldhana News: बुलढाण्यात संत्रा पिकावर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव; संत्र्याचं पिक धोक्यात, बळीराजासमोर आव्हान
बुलढाणा जिल्ह्यात जळगाव, संग्रामपूर, लोणार परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात साधारणतः दीड ते दोन हजार हेक्टर शेतीत संत्रा लागवड केलेली आहे.
यावर्षी बदलत्या वातावणामुळे संत्रा बागांवर रेड माइट नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्यांची फळे काळी आणि पिवळी पडत आहेत .
यामुळे व्यापारी संत्री घ्यायला तयार नसून संत्री तशीच पडून आहेत.
त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झाले असून संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लोणार तालुक्यातील कारेगाव येथील विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्यांच्या सात एकर संत्रा बागेत या रेड माईट नावाच्या रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने संत्री काळी आणि पिवळी पडली आहे.
आधीच संत्रा उत्पादनासाठी मोठी कसरत कारवाई लागत असल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे
त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत.
सरकारने, कृषी विभागाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, औषधोपचाराबद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली
यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना भरपूर अपेक्षा होत्या.