Beed Tractor Morcha : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडमध्ये किसान सभेचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा
भारतीय किसान सभेच्या वतीने बीडच्या वडवणीमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा अशी मागणी या ट्रॅक्टर मोर्चात करण्यात आली
त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्यातअशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा अदा करुन अतिवृष्टीचे नुकसान देण्यात यावं या मागण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
या मोर्चामध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या मोर्चातून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव करुन देणार असल्याच किसान सभेने म्हटलं
विविध मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी मांडण्यात आल्या.
वीज विधेयक वापस घ्या, शेतकऱ्यांना 12 तास पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
किसान सभेच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.