Bhandara : भंडाऱ्यात बैलांसह भरला ट्रॅक्टरचा पोळा
बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली आहे. त्यामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी गावात बैलांसह ट्रॅक्टरचाही पोळा मोठ्या उत्साहात भरवण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बैलाबरोबरच ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला.
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा (Bail pola). काल राज्यभरात उत्साहत बैलपोळ्याचा सण साजरा झाला.
अलिकडच्या काळात बैलांची संख्या प्रचंड रोडावली आहे. त्यामुळं शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करायला लागलेत
शेतीच्या कामासाठी बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर व्हायला लागला.
बैलजोडी पोळ्यात घेऊन जाता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून पोळ्यात सजविलेले ट्रॅक्टर घेऊन जाणे सुरु केले.
पवनी येथील चंडिका मंदिर परिसरात सन 2019 मध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. त्यानंतर कोरोना कालावधीत तो बंद झाला.
पवनी येथील चंडिका मंदिर परिसरात सन 2019 मध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. त्यानंतर कोरोना कालावधीत तो बंद झाला.
गुडेगाव येथे ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली. ती अद्यापही सुरुच आहे. यावर्षी धानोरी, कोदूर्ली यासह मोहाडी तालुक्यातील सतोना यासह अन्य काही गावांमध्ये बैलजोडी व ट्रॅक्टरचा संयुक्त पोळा भरविण्यात आला.