Photo : ढगाळ वातावरणाचा कापसासह 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता
राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा फटका शेती पिकांना बसत आहे. कापूस पिकावरही या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या वातावरणामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण याचा फटका शेती पिकांना बसत आहे. गहू पिकावर देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) देखील झाला आहे.
हरभरा पिकावर देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. हरभऱ्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
बदलत्या वातावरणामुळं तूर उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण तुरीवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली असून, धुक्यामुळं हरभरा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं ढगाळ वातावरण आहे. काल (5 जानेवारी) अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील हरभरा, तूर, कापूस आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके पसरले आहे. त्यामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. हिंगोलीचे तापमान 16 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे.
हवामानाच्या बदलाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या फळबागा संकटात सापडल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळं या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.