Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : गहू आणि तांदळाचे ई-लिलाव होणार, FCI च्या अध्यक्षांची माहिती
गहू (wheat) आणि तांदळाच्या (Rice) किरकोळ बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं भारतीय अन्न महामंडळाला (FCI) ई-लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर (गहू साठा निरीक्षण यंत्रणा) नोंदणी अनिवार्य आहे.
भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक के. के. मीना यांनी याबाबतची माहिती दिली.
गहू आणि तांदळाचे किरकोळ बाजारातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारातील हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.
लिलाव प्रक्रियेतील सहभागी होणाऱ्या अधिकृत विक्रेते आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एफएसएसएआय (FSSAI) परवाना अनिवार्य करण्यात आला आहे.
वाढत्या किमंतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू आणि तांदळाचे ई-लिलाव करणार
गव्हाची आधारभूत किंमत सध्याच्याच पातळीवर स्थिर ठेवण्यात आली आहे. फेअर ऍव्हरेज क्वालिटी (FAQ) साठी प्रतिक्विंटल 2150 रुपये आणि अंडर रिड्यूज स्पेसिफिकेशन (URS) गव्हासाठी प्रतिक्विंटल 2125 रुपये आहे.
व्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने या लिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर नोंदणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
-लिलावामध्ये खरेदीदार ज्या कमाल रकमेसाठी बोली लावू शकतो ती कमाल मर्यादा 100 MT (मेट्रिक टन) पर्यंत मर्यादित आहे.