Truck Driver Strike : सध्याच्या काळात आपल्या आवडीचे पदार्थ आपण ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करुन मागवतो असतो. घरबसल्या किंवा ऑफिसमधून ऑर्डर केल्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचते. आपण घर आणि ऑफिस शिवाय इतर ठिकाणाहूनही बऱ्याचदा काहीना काही मागवत असतो. दरम्यान, ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झोमॅटो आणि इतर काही कंपन्या डिलिव्हरी बॉय नेमतात. झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय ऑर्डर वेळेत पोहचवण्यासाठी अविरतपणे कार्यरत असतात. त्यामागे त्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागते. मात्र, तुम्ही आत्तापर्यंत त्यांना दुचाकी, सायकल किंवा पायी येताना पाहिले असेल. पण तुम्ही झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला ऑर्डर देण्यासाठी घोड्यावरुन येताना पाहिले आहे का? सध्या ट्रक चालकांच्या संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय घोड्यावरुन प्रवास करतोय. 


नवीन मोटार वाहन कायद्यातील अनेक तरतुदींवर आक्षेप घेत ऑल 'इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस'कडून संप पुकारण्यात आला होता. यानंतर अनेक पेट्रोल पंप बंद राहतील, अशी अफवा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पसरली होती. यानंतर त्यामुळे लोकांनी पेट्रोलचा साठा आपल्या वाहनांमध्ये असावा, यासाठी पंपावर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. दरम्यान, अशा परिस्थितीत एका डिलिव्हिरी बॉयने ऑर्डर देण्यासाठी चक्क घोड्यावरुन प्रवास केलाय. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरुन प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यावेळी त्याच्याकडे पार्सलच्या अनेक बॅग आहेत. 


वेळेत ऑर्डर पोहोचवण्यासाठी कसरत 


झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयवर ऑर्डर वेळेत पोहोचवण्याचे टार्गेट असते. वेळेत ऑर्डर पोहोचली नाही, तर झोमॅटोसारख्या अनेक कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर जाहीर करतात. त्यामुळे डिलिव्हरी बॉय वेळेत ऑर्डर पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत घेत असतात. घोड्यावरुन डिलिव्हरी बॉयने केलेला प्रवास हे त्यांच्या मेहनतीचे आणखी एक उदाहरण म्हणता येईल. 


ट्रक चालकांचा कोणत्या तरतुदींवर आक्षेप?


नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Truck Driver Strike : मालवाहतूकदारांचा संप मागे; 'हिट अॅण्ड रन' कायद्याला 'रेड सिग्नल', केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत काय झालं?