यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला यवतमाळ (Yavatmal Crime) एलसीबी पथकाने रिव्हॉल्वरसह अटक केली आहे. ही कारवाई महागाव परिसरात कलगाव टी पॉईंट परिसरात करण्यात आली. सुरज नरवडे असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो महागाव (Yawatmal News) येथील संभाजी चौक येथील रहिवासी आहे. महागाव परिसरात या आरोपी विरोधात यापूर्वी देखील मोटार सायकल चोरी, रेती चोरी, दारू संबंधित अनेक गुन्हे दाखल आहे. हा आरोपी परिसरात रिव्हॉल्वर घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे महागाव शहरातील कलगाव टी पॉईंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून रिव्हॉल्वरसह मॅग्जीनमध्ये असलेले एक जिवंत काडतूसही जप्त केले.
रिव्हॉल्वर मॅग्जीनसह आरोपीला बेड्या
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून रेती तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या तस्करांच्या विरोधात शासनाच्या वतीने कंबर कसली आहे. असे असतांना या तस्करांची शिरजोरी वाढली असून या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचे प्रकार घडत आहे. अशीच एक घटना यवतमाळच्या महागाव येथे 23 ओक्टबरच्या रात्री घडली. ज्यामध्ये रेती तस्करा विरोधात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यावर रेती तस्करांनी धक्काबुक्की करत प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान महागाव परिसरात कलगाव टी पॉईंटजवळ हा आरोपी रिव्हॉल्वर घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या आरोपीला अटक केली. यावेळी या आरोपी कडून एक रिव्हॉल्वर,मॅग्जीनसह एक जिवंत काडतू जप्त केले.
अवैध तस्करी विरोधात कारवाई केल्याने हल्ला
23 ओक्टबरच्या रात्री महसूल विभागाला मोरथ ते वाकोडी पूस नदी पात्रात ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांना मिळाली. त्यांनी कोतवालासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन धाड टाकली. त्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मात्र अचानक टाकलेल्या या धाडीनंतर त्यातील काही मजुरांना पळ काढण्यास यश आले. दरम्यान या कारवाई मध्ये एका रेती तस्कराने महसूल कर्मचारी पथकातील एकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तहसीलदारांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अशात आपला बचाव करत कारवाई करणाऱ्या पथकाने माघार घेत थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
ही बातमी वाचा: