यवतमाळ: यवतमाळ शहरालगतच्या ( Yavatmal Crime ) वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. योगेश नरहरी काटपेलवार असे मृत शिवसैनिकाचे (Shiv Sena) नाव आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येनंतर काटपेलवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हत्येच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
यवतमाळ शहरात उपचारादरम्यान शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश नरहरी काटपेलवार (36) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. योगेशची हत्या जुन्या वादातून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत मारेकऱ्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आगे शिवाय हत्येच्या वेळी घटनास्थळी असलेल्या एका संशयितासह महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करत आहे.
जुन्या वादाचा वचपा काढल्याचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल होऊन घटनेची माहिती घेतली आहे. शिवाय घटनास्थळावरून एका संशयित व्यक्तीसह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास पोलिसांमार्फत करण्यात येत असून या हत्येमागील मुख्य आरोपी कोण याचा तपास पोलीस घेत आहेत.या घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार,ग्रामीण ठाणेदार प्रकाश तुनणकलवार सहाय्यक निरीक्षक राहुल शेजव आदींना भेट देऊन तपास सुरू केला आहे.
मुंबईतही शिवसेनेच्या दोन गटामध्ये राडा
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे ही वाचा :