मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray Death Anniversary)  शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या राड्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर  निशाणा साधला आहे. ज्या बेईमान लोकांनी काल स्मृतीस्थळी नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं? असे म्हणत संजय राऊतांनी  शिंदे गटावर टीका केली आहे. गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर, 2024 ला पिक्चर दाखवणार असे संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


संजय राऊत म्हणाले,  बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या समाजकारणातलं महान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर मुंबई मराठी माणूस स्वाभिमानाने ताठ मान करून असलेला माणूस आपल्याला दिसला नसता. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड ठेवला आहे. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये काम त्यांच्यामुळे करत आहेत. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळे आहे.  


पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसला?


बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो शिवसैनिक कसला? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं. पण काल स्मृतीस्थळावर ज्यांनी नोटंकी केली त्यांना शिवसैनिक आम्ही कधीच मानणार नाही. त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही. संत तुकडोजी महाराजांच एक अभंग आहे. मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही. तुमच्या मनात श्रद्धा नाही भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी करत आहे. 


मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत बसले तोपर्यंत बीजेपीचे पोपट


तुमच्या मनामध्ये बाळासाहेबांबद्दल भाव नाही आणि स्मृतिस्थळावर येऊन नौटंकी करता. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्यांना जर विरोध केला असेल तर महाराष्ट्राला तो मान्य नाही. कुणी काहीही म्हणू दे काल जो प्रकार घडला निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला हा कालचा ट्रेलर आहे आणि 2024 ची तयारी आहे .काल जे आले होते त्यातील अर्ध्या लोकांनी आधीच दहा पक्ष सोडले होते. ते कधी राम बनले ते बिभीषण बनले आहेत. बिभीषण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा आला होता तेव्हा प्रभुरामाने त्याचा वापर केलाय नंतर त्यांना सोडून दिले त्यांना काय माहित राम काय आहे. या लोकांना अयोध्या आम्ही पहिल्यांदा दाखविली. उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वात ते आयोध्येत गेले. आता मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत बसले आहेत तोपर्यंत बीजेपीचे पोपट म्हणून बोलत राहतील, असे संजय राऊत म्हणाले.  


हे ही वाचा :


'मातोश्री' बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुले करा, स्मृतिदिनी भाजपची मोठी मागणी