यवतमावळ : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आता गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सरसावल्याचं दिसून येतंय. यवतमाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी नागपूर कराराची (Nagpur Agreement) होळी करून वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचा (Seperate Vidarbha Protest) पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत विदर्भवीर जांबुवंतराव धोटे (Jambuwantrao Dhote) यांच्या कन्या क्रांती धोटे आणि जयश्री पाटील उपस्थित होत्या.
वेगळ्या विदर्भासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. विदर्भातील बहुतांश नेत्यांची वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा आहे. पण अलिकडच्या काळात वेगळ्या विदर्भाची मागणी काहीशी मागे पडल्याचं चित्र आहे. एकेकाळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे (Jambuwantrao Dhote) यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर मोठं आंदोलन पेटवलं. त्यांच्या निधनानंतर वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी तितकासा मोठा नेता मिळाला नाही.
त्यानंतर या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी श्रीहरी अणे यांनी आंदोलन सुरू केलं. पण त्यामध्येही तितकासा जोर नसल्याचं दिसून आलं. आता या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करत त्यांनी नागपूर कराराची होळी केली.
संयुक्त महाराष्ट्रात नागपूर विभागाचा समावेश करताना त्या भागातल्या नेत्यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये विदर्भासाठी वेगळा निधी, वर्षातले एक अधिवेशन हे नागपुरात व्हावे यासह इतर मागण्या या नागपूर करारात होत्या. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी हा करार स्वीकारला आणि त्यानंतर विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला.
विदर्भवाद्यांचा नागपूर कराराला विरोध
वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांनी नागपूर कराराला (Nagpur Pact) सुरुवातीपासूनच विरोध केल्याचं दिसून येतंय. ज्या ज्या वेळी वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन केलं जातं त्या त्या वेळी या नागपूर कराराची होळी करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात विदर्भाचा विकास खुंटला असल्याची भावना वेगळ्या विदर्भवाद्यांकडून व्यक्त केली जाते. मागील काही दशकांपासून स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलने सुरू आहेत. या मुद्यावर अनेकदा राजकारणही झालेले आहे.
तर एसटीचं चाक फिरू देणार नाही, सदावर्तेंचा इशारा
दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि विलिनीकरणाचा विषय मार्गी लागला नाही तर महाराष्ट्रात एसटीचे चाके फिरू देणार नाही असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
ही बातमी वाचा: